नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी देशवासियांना मदतीचे आवाहन करतांना २२ मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठ वाजता देशातील नागरिकांना संबोधित केले. यात ते म्हणाले की, कोरोनाचा प्रतिकार करणे शक्य असले तरी येत्या काही दिवसांमध्ये याचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. यामुळे लोकांनी शक्य असेल तरच बाहेर पडावे. देशासाठी काही दिवस देण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबत त्यांनी २२ मार्च रोजी देशभरात सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळेत देशभरातील जनतेने घरातच बसून रहावे असे आवाहन मोदी यांनी केले आहे.