जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील भडगाव व वरणगाव नगरपालिका निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठीकीचे रविवार २० डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
भडगाव व वरणगाव नगरपालिका निवडणुकीचा आढावा व नियोजन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदिया, प्रदेश पदाधिकारी मा. खा. डॉ. उल्हास पाटील, आ. शिरीष चौधरी, डी. जी. भाऊसाहेब पाटील, यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भडगाव येथे तर दुपारी ३ वाजता वरणगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला भडगाव ब्लॉक अध्यक्ष, भुसावळ ग्रामीण अध्यक्ष, वरणगाव शहर अध्यक्ष यांनी आपापल्या नगरपालिका व ब्लॉक क्षेत्रातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, फ्रँटल व सेलचे पदाधिकारी, निवडणूक लढवू इच्छिणारे कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित राहावे असे आवाहन कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी केले आहे.