अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रडावण राजोरे येथे पाणीपुरवठा योजनेसह विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी 114 लक्ष निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे रुपये भूमिपूजन करण्यात आले,ग्रामस्थानी आमदारांचे गावात जल्लोषात स्वागत करून सत्कार केला. या प्रसंगी सरपंच डोमन पाटील, उपसरपंच अनिल पाटील, राजेंद्र पाटील, गणेश पाटील,सुंदरपट्टीचे मा.सरपंच सुरेश पाटील, हेडावे चे मा.सरपंच रवींद्र पाटील, ढेकूचे निकम तात्या, एल.टी.नाना, सरपंच बबन पाटील, कैलास पाटील, सागर पाटील, दीपक पाटील, गोविंदा पवार, भैय्यासाहेब पाटील, वसंत पाटील, वाल्मीक पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, बापू पवार, कैलास पाटील, बाळू पाटील, गोलू पाटील, मणिलाल काळे, किशोर पाटील, पांडुरंग पाटील, सागर पाटील, सुनील पाटील, बापू पाटील, राजू मोरे, गोकुळ पाटील, दिनेश पवार, संदीप पाटील, बापू मराठे यांचा सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
मतदारसंघात अनेक गावांत नव्या पाणीपुरवठा योजनांचे काम जोमाने सुरू असून सदर योजना पूर्णत्वास आल्यानंतर ही गावे नक्कीच टंचाई मुक्त होतील अशी भावना रडावण राजोरे येथे विविध विकासकाम तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भुमीपूजन प्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी 2515 अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम रक्कम 7 लक्ष, डी.पी.डी.सी.अंतर्गत संरक्षण भिंत जि.प. शाळा रक्कम 4.12 लक्ष, क्रिडा विभाग अंतर्गत नविन व्यायाम शाळा बांधकाम 7 लक्ष, 2515 अंतर्गत विठ्ठल मंदिर परिसरात सभागृह बांधकाम 20 लक्ष, जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना 1 कोटी 14 लक्ष असे एकुण 1कोटी 52 लक्षच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.