यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाच्या शिक्षिका रझिया इतबार तडवी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव येथे श्री स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्यात रझीया इतबार तडवी यांना २०२१ चे आदर्श सन्मानपत्र प्रदान करण्यात येवुन त्यांचा गौरव करण्यात आला. श्री स्वामी समर्थ गृप व मौलाना आझाद फाऊंडेशन जळगाव यांच्या वतीने रविवार दि.१२ रोजी रतनलाल सी.बाफना गो सेवा अनुसंधान केंन्द्र(गो शाळा)कुसुंबा,जळगाव येथे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष ना. रंजनाताई प्रल्हाद पाटील, डॉ. पुनम पाटील , जिल्हा कृषी अधिकारी मुक्ता कोकाटे , जिल्हा क्रिडा अधिकारी रेखा देविदास पाटील , आयोजक ज्योती मनोज पाटील ( श्रीस्वामी समर्थ ग्रुपसंचालीका ), मौलाना आझाद फाउंडेशन जळगावच्या समनव्यक बुशरा शेख , हर्षाली राजीव पाटील , प्रतिक्षा मनोज पाटील यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थित आयोजीत या कार्येक्रमात रझिया तडवी यांना सन्मांनीत करण्यात आले. रझिया तडवी या यावल तालुक्यातील किनगाव बुद्रूकचे उपसरपंच लुकमान कलंदर तडवी यांच्या पत्नी आहेत.रझिया तडवी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे समाज बांधव विद्यालयाचे मुख्याध्यापक पी .एस . गोसावी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्वत्र शिक्षिका रझीया तडवी यांच्या अभिनंदन व कौतुक होत आहे.