Home आरोग्य रक्तदान शिबीर काळाची गरज : खासदार रक्षाताई खडसे

रक्तदान शिबीर काळाची गरज : खासदार रक्षाताई खडसे

0
33

भुसावळ, प्रतिनिधी । जनतेच्या मदतीला भाजप आहे सोबतीला, या उक्तीप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित भव्य रक्तदान शिबिर ही काळाची गरज असून, सध्या करोना महामारीमध्ये असे शिबीर जागो जागी भरण्याची गरज आहे,असे प्रतिपादन रावेर लोकसभाचे  खा. रक्षाताई  खडसे यांनी यांनी केले.श्री.पुंडलिक बऱ्हाटे शाळेमध्ये आज भारतीय जनता युवा मोर्चा तर्फ आयोजित भव्य रक्तदान शिबीरात त्या बोलत होत्या. 

खा. रक्षाताई खडसे यांनी   सेवा,संघर्ष,समर्पण,संवाद, आणि सम्मान या पंचतत्वावर भाजपचे कार्य चालत असून नवनियुक्त युवा मोर्चा चे शहरातील पहिलेच शिबीर नियोजन बद्ध झाल्याने सर्वांचे कौतुक केले. आ.संजय सावकारे यांनी युवा मोर्चास शुभेच्छा देतांना सांगितले की,    ज्या ज्या वेळेस संकट उभे राहिले त्या त्या वेळेस युवा मोर्चा जनतेच्या सेवेसाठी धावत आला आहे. युवा मोर्चा भाजप चे कवचकुंडले आहेत. नवनियुक्त युवा कार्यकारणीचा हा पहिलाच उपक्रम असून आगामी उपक्रमास शुभेच्छा.  याप्रसंगी भाजपा जळगाव ग्रामीण अध्यक्ष आ. राजुमामा भोळे,आ. संजय सावकारे, शहर अध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे , उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकीय आघाडीचे डॉ. नितु पाटील, सरचिटणीस रामाशंकर दुबे, अमोल महाजन,संदीप सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे,युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी,उद्योगपती मनोज बियाणी,राजेंद्र चौधरी,कायदा आघाडी अध्यक्ष अँड.अभिजित मेने, अनुसूचित जाती अध्यक्ष राहुल तायडे,शैलजा पाटील, गिरीश महाजन,सतीश सपकाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी ४३  रक्तबॅग संकलन झाले असून प्रत्येक रक्तदात्याचा सन्मान करत त्यांना सर्टिफिकेट,स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचारपुस्तक,सॅनिटीझर बाटली,N95 मास्क आदी भेट देण्यात आले.

यावेळी श्रेयस इंगळे , नंदकिशोर बडगुजर,अमित असोदेकर, गोपीचंद राजपूत , अथर्व पांडे, विनीत पाटील ,राहुल मेरानी, अनुप पुरोहित, देवेश कुळकर्णी, प्रशांत भट , नेहल लढे, सोनू सचदेव, सागर जाधव, प्रणव डोलारे, स्वप्नील काळे,विजय डोंगरे, अमोल जोशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेखर पाटील तर आभार अनिरुद्ध कुलकर्णी यांनी मानले.

 


Protected Content

Play sound