रंजाणे-अंतुर्ली रस्त्यावर अपघात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथून शाळेतून रिक्षाने घरी जात असताना रंजाणे-अंतुर्ली रस्त्यावर पेजो रिक्षा व मोटार सायकल यांचा समोरासमोर अपघात झाल्याने शाळकरी मुले जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, आमोदे ता. अमळनेर येथील विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी अमळनेर येथे येतात आज ता.21 रोजी दुपारी शाळा सुटल्यावर आमोदे येथे घरी जात असताना रंजाणे-अंतुर्ली रस्त्यावर पेजो रिक्षा एम एच 18 ऐ 2380 क्रमांकाची व मोटार सायकल यांचा समोरासमोर अपघात झाल्याने यात शाळकरी मुले जखमी झाले आहेत. यात आमोदे येथील डी आर कन्या शाळा अमळनेर इयत्ता आठवीची विध्यार्थिनी माधवी किशोर पाटील जबर जखमी झाली असून तिचे पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून हातही फ्रॅक्चर झाला आहे तर चेहऱ्यावर जखम झाल्या आहेत. तिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला ताबडतोब धुळे येथे खाजगी रुग्णालयात हलविले आहे.
तिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला अत्यावश्यक वार्ड मध्ये दाखल केले असून उपचार सुरु आहेत.तर मोटार सायकल चालक हाही जखमी झाला असून तो पिगळवाडे येथील असल्याचे समजते. त्यांना ही धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत.

आमोदे येथील विद्यार्थी अमळनेर येथे रिक्षाने प्रवास करीत शाळेत येतात. आज दुपारी घरी परत जाताना हा अपघात झाला. यात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले मात्र माधवी पाटील ह्या विध्यार्थिनीचे पाय चार ठिकाणी तर एक हात फ्रॅक्चर झाल्याने तिच्या आई वडिलांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.

Protected Content