योग समन्वय समितीतर्फे ‘विशेष कलाकृती’ स्पर्धेचा निकाल जाहीर

जळगाव प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग समन्वय समितीच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ‘योगा विथ फॅमिली अर्थात पारिवारिक योग’ या विषयावर निबंध, चित्र, पोस्टर, कविता, चारोळी, छोटी नाटिका, रांगोळी सर्व समावेशक विशेष कलाकृती घेण्यात आले.   या स्पर्धेत जिल्ह्यात राज्यातील अनेक ठिकाणाहून प्रतिसाद मिळाला होता. योग समन्वय समितीच्या वतीने २३ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला.

स्पर्धेत उत्तम प्रतिसाद
योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कलाकृती स्पर्धा जिल्हास्तरीय राबविण्यात येत असतांना या स्पर्धेला राज्यातूनही उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला. अपेक्षेपेक्षा अधिक यश प्राप्त झाले. आता ही स्पर्धा जिल्हास्तरीय राहिलेली नसून राज्यस्तरीय झालेली आहे.

‘योगा विथ फॅमिली’ संकल्पना राबविली
योग समन्वय समितीने योगासंदर्भात आकाशवाणी, व्हिडीओ, वेबीनार व प्रश्नावलीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने झुम ॲपच्या माध्यमातून योगा विथ फॅमिली ही संकल्पना राबविली. यात ओमकार, पूरक हालचाली, आसन, प्राणायाम, ध्यान, योगिक आहार, निसर्गोपचार आणि शेवटी शंखनाद या सर्व आयामांचा समावेश होता.

डिजीटल प्रश्नावली
योगाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने सोशल मीडियावर डिजीटल प्रश्नावली तयार करण्यात आली. या प्रश्नावली स्पर्धेसाठी एकुण १८५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. योग दिनाच्या निमित्ताने निबंध, चित्र, पोस्टर, कविता, चारोळी, छोटी नाटिका, रांगोळी स्पर्धांचा निकाल आज जाहिर करण्यात आला आहे.

विषयनिहाय लागलेला निकाल याप्रमाणे
निबंध
1.ज्योती लीलाधर राणे, जळगाव
2. स्वाती राजेश फिरके, जळगाव
उत्तेजनार्थ – योगेश धांडे, रिसोड, जी. वाशीम

चित्रकला
1. प्रिया कासार
2. पंकज साखरे, भुसावळ
उत्तेजनार्थ – सुभाष विजापूर, सोलापूर

रांगोळी
1. निखिल धावडे, सातारा
2. अनुजा चौधरी, जळगाव

योगिक नृत्य
1. डॉ. शरयू विसपुते

लघु नाटिका
1. सुषमा सोमवंशी, जळगाव
2. कल्पना साखला, जळगाव

कविता
1. किशोरकुमार बनसोडे, कुडवा, जी. गोंदिया
2. सौ.मनीषा चौधरी, जळगाव

चारोळी
1. रक्षा पांडे, कोपरगाव
2. शिशिर जावळे, भुसावळ

Protected Content