मुंबई : वृत्तसंस्था । फिल्म इंडस्ट्री मुंबईप्रमाणे तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, प. बंगाल येथेही आहे. योगी आदित्यनाथ तिथंही जाऊन अभिनेते, निर्मात्यांशी बोलणार का? त्यांनाही यूपीत घेऊन जाणार का? की त्यांचा पंगा फक्त मुंबई आणि महाराष्ट्राशी आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. कालपासून त्यांच्या दौ-याला सुरुवात झाली आहे. मुंबईत आल्याआल्या त्यांनी पहिल्यांदा बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. सीएम योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमिवर आदित्यनाथ-अक्षय यांची भेट झाली का? यावरून चर्चेला उधान आले आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अक्षयकुमार व योगी आदित्यनाथ भेटीच्या मुद्द्यावरून टीका करीत मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही. असं राऊत म्हणाले आहेत.
बॉलिवूड तसेच उद्योगजगतातील मान्यवरांशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चर्चा करणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशात मुंबईच्या धर्तीवर फिल्मसिटी उभारण्याची मुख्यमंत्री अदित्यनाथ यांची योजना असून यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे.