योगिक सायन्स पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सुवर्णपदक व दोन लाखाचा धनादेश

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. (योगिक सायन्स) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास स्व. इच्छाराम झिंगा पाटील यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक दिले जाणार असून त्यासाठी विद्यापीठ उप अभियंता राजेश पाटील यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला.

स्व.इच्छाराम पाटील हे शिक्षक होते. मारवड ता. अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेल्या इच्छाराम पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांसाठी लढे उभारले होते. अत्यंत गरीबीतून त्यांनी मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रेरीत केले. त्यांची मुले व मुली, सून व जावई हे सर्व शिक्षण क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. गतवर्षी इच्छाराम पाटील यांचे निधन झाले. त्‍यांच्या स्मरणार्थ एम.ए. (योगिक सायन्स) या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सुवर्णपदक दिले जाणार आहे.

हा धनादेश देतांना प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.दीपक दलाल, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, अहिल्यादेवी इच्छाराम पाटील, मिनाक्षी पाटील, इंजि.राजेश पाटील, ममता पाटील, रागिणी चव्हाण, भाग्यश्री दंदी, रवींद्र पाटील, किशोर चव्हाण, प्रा. नवीनचंद्र दंदी, आदी उपस्थित होते.

Protected Content