मुंबई प्रतिनिधी । येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अखेर अटक केली आहे.
येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीने शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर शनिवारी दिवसभर कपूर यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत कपूर यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असून अधिक तपासासाठी मध्यरात्रीनंतर कपूर यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. कपूर यांनी प्रामुख्याने काही वित्त तंत्रज्ञान (अॅपआधारित पेमेंट) कंपन्यांना नियमबाह्य कर्ज दिले व त्यासाठी विदेशी चलन वापरले, ही कर्जे थकीत झाली व त्यामुळेच बँक संकटात आली या संशयावरुन ईडीने हा छापा टाकला होता. यांनंतर त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.