मुंबई (वृत्तसंस्था) आज सकाळी बाजार उघतच मुंबई शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण झाली. मात्र, आज येस बँकेचा शेअर 4.90 रुपयांनी वाढला असून 21.10 वर गेला आहे.
गुरुवारी येस बँकेवरील निर्बंध जाहीर करण्यात आले. यामुळे शुक्रवारी शेअरबाजारात मोठी घसरण झाली होती. परंतू आज सुमारे 188 शेअर्समध्ये वाढ झाली तर 520 शेअर्स घसरले. वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, आयओसी आणि येस बँकेचा समावेश आहे. तर एसबीआय, ओएनजीसी, जेएसडब्ल्यू स्टील, वेदांत, हिंडाल्को, इंडसइंड बँक आणि रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झाली. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या घडामोडींमध्ये एसबीआय येस बँकेत 49 टक्के गुंतवणूक करणार असल्याने पार रसातळाला गेलेला येस बँकेचा शेअर 30 टक्क्यांनी वधारला. पण याचा फटका एसबीआयला बसला असून 6 टक्क्यांनी पडला आहे. आज येस बँकेचा शेअर 4.90 रुपयांनी वाढला असून 21.10 वर गेला आहे. तर एसबीआयचा शेअर 16.85 रुपयांनी घसरला असून 254 रुपयांवर स्थिरावला आहे.