चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | येवल्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्याला चाळीसगाव शहर पोलिसांनी सापळा रचून येथील दर्गा परिसरातून अटक केली आहे. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी दोघांनाही येवला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शहरातील दर्गा परिसरात काल रात्री शहर पोलीस गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक इसम एका अल्पवयीन मुलीसोबत मिळून आला. त्याला त्याचे नाव विचारले असता
अमोल उर्फ भावड्या दिलीप वाघ (वय-२४) रा. राजापुर ता. येवला जि. नाशिक असे सांगितले. मात्र सदर अल्पवयीन मुलीविषयी पोलिसांनी माहिती विचारली. परंतु त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्याच्यावर अधिक संशय बळावला. त्याकरीता शहर पोलिसांनी येवला येथील पोलिस स्थानक जि. नाशिक येथे संपर्क साधुन त्याचे व अल्पवयीन मुलीबाबत माहीती घेतली असता त्याने अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेलेबाबत येवला पोलीस स्थानकात भादवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे कळाले. व इतर ३ गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर आरोपीच्या ताब्यात एक मोटारसायकल देखील मिळुन आलेली आहे. ती मोटारसायकल सुध्दा चोरीची असल्याची माहीती प्राप्त असुन त्याबाबत गुन्हा दाखल आहे. सदर संशयितावर यापुर्वी शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे एकुण ६ गुन्हे दाखल असुन त्यास माहे आँगस्ट-२२ पासुन नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातुन हद्दपार केल्याबाबतची माहीती समोर आली असून दोघांनाही येवला तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. व पुढील तपास येवला तालुका पोलीस स्थानक करीत आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह सपोनि विशाल टकले, सपोनि सागर ढिकले, पोहेकॉ योगश बेलदार, पोहेकॉ नितीन वाल्हे, पोना राहुल सोनवणे, पोना भुषण पाटील, पोना पंढरीनाथ पवार, पोना विनोद भोई, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकाँ निलेश पाटील, पोकाँ अमोल भोसले, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ भरत गोराळकर, पोकॉ हरीशचंद्र पाटील, पोकाँ मनोज तडवी, पोकॉ दिलीप राक्षे, पोकाँ पवन पाटील, पोकाँ मनोज चव्हाण व पोकाँ सबा फरहीन अ. हकीम शेख आदींनी केली आहे.