येवती गावाला खासदार रक्षाताई खडसे यांची सदिच्छा भेट ; जनजागृती मोहिमेचा घेतला आढावा

 

मुक्ताईनगर, प्रतिनिधी ।  शासनाच्या माध्यमातून बोदवड तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये कोरोना संदर्भात जनजागृती व कोविड टेस्ट करण्यात येत आहे. यात येवती गावात कोरोना संसर्ग व कोविड टेस्ट बाबत जनसामान्यांना जागृत करण्यात येत आहे.  खासदार रक्षाताई खडसे या बोदवड तालुक्याच्या दौऱ्यावर असतांना येवती येथील ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन जनजागृती मोहिमेचा आढावा घेतला.

बोदवड तहसीलदार घोलप  आणि पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून सर्वसामान्यांना कोविड टेस्ट करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जनजागृती केली जात आहे.  बोदवड तालुक्यात औषधींचा तुटवडा भासल्यास तत्परतेने त्या उपलबध करून दिल्या जातील तसेच कोरोनाच्या लढ्यासाठी अवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन खासदारांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. जास्तीत जास्त वेगाने जनजागृती मोहीम व कोविड टेस्टिंग वाढविण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी बोदवड ग्रामपंचायत सरपंच संजय पाटील, एम.ओ.डॉ.अजय सपकाळ, ए.एन.एम.डी.पी.कदम, एच.के.डब्ल्यू.एच.के.तायडे, एम.पी.डब्ल्यू.आशिष पवार, बोदवड तालुका भाजपा अध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील, भाजप युवामोर्चा अध्यक्ष विक्रम वरकड, शहर अध्यक्ष नरेश अहुजा, उपाध्यक्ष भागवत चौधरी, युवामोर्चा सरचिटणीस उमेश पाटील, राजू डापसे, अमोल शिरपूरकर आणि इतर भाजपा कार्यकर्ते आणि इतर गावकरी उपस्थित होते

 

Protected Content