एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जळगांव जिल्हा युवासेनेची कार्यकारणी दैनिक सामना वृत्तपत्रातून जाहीर केली. या कार्यकारिणीत एरंडोल येथील शिवसैनिक अतुल महाजन यांची जिल्हा समनव्यकपदी नियुक्ती करण्यात आली.
अतुल महाजन यांच्याकडे एरंडोल-पारोळा, पाचोरा-भडगाव मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आले आहे. अतुल महाजन हे गेल्या ९ वर्षांपासून युवासेना शहरप्रमुख पदावर कार्यरत असून त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून विविध सार्वजनिक उपक्रम राबविले तसेच अनेक आंदोलन, निवेदन, रास्तारोको करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. शिवसेनेत नुकत्याच झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई येथील शिवसेना भवनात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन युवासैनिक एकनिष्ठ असल्याची ग्वाही दिली. गेल्या महिन्यात झालेल्या शिवसंवाद दौऱ्याप्रसंगी एरंडोल शहरातून आदित्य ठाकरेंचा भव्य रोड शो यशस्वी नियोजन त्यांनी शहर युवासेनेच्या माध्यमातून केले आहे.
आगामी काळात युवासेनेचा शहरी तसेच ग्रामीण भागात विस्तृतपणे विस्तार करून “गावं तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक” हा उपक्रम राबवून संघटना मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्ती बद्दल युवासेना सचिव वरुण सरदेसाई, संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, विस्तारक चैतन्य बनसोडे, महिला जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, नवनियुक्त युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी जि.प.उपाध्यक्ष हिंमत पाटील, सभापती दिलीप रोकडे, उपसभापती अनिल महाजन, युवासेना उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील, युवासेना तालुका समनव्यक कमलेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, संदीप पाटील, परेश बिर्ला, अमोल भावसार, कुणाल पाटील, युवराज महाजन, रेवानंद ठाकूर, देवेन पाटील यांनी अभिनंदन केले.