युनिटी ऑफ नेशन फाउंडेशनच्यावतीने विविध उप्रकम राबवून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त युनिटी ऑफ नेशन फाउंडेशनच्यावतीने अध्यक्ष लतेश  चौधरी व  सचिव चैतन्य ( गुड्डू ) कोल्हे यांच्या  नेतृत्वात अयोध्या नगर येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवानिमित्त युनिटी ऑफ नेशन फाउंडेशनतर्फे कार्यक्रमास उपस्थित सैनिकांच्या व मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचे हे ७५ वे वर्ष असल्याने ७५ सैनिकांचा व  पोलिसांचा मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या चरित्रपुस्तक व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला . तसेच कार्यक्रमाअंतर्गत ७५ गोमातांचे लसीकरण  , ७५ विद्यार्थ्यांना  मुखपृष्ठावर राष्ट्रपुरुषांचे चित्र व माहिती असणाऱ्या वह्या वाटप व राष्ट्रपुरुषांच्या चरित्र पुस्तकाचे वाटप , ७५ गरजू  महिलांना साडी वाटप, ७५ वृक्षारोपण, ७५ कामगारांची ई श्रम कार्ड नोंदणी, ७५ दीप  प्रज्वलित करून भारत देशासाठी  शाहिद झालेल्या सर्व शाहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन सैनिकांतर्फे खान्देश रक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदिप सुरळकर उपस्थित होते.  तसेच नगरसेवक सुनील खडके , नगरसेवक डॉ. विरण खडके , नगरसेविका रंजना वानखेडे , महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते हर्षल मावळे , युवा सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, माजी नगरसेवक प्रदीप रोटे , युवासेनेचे शंतनु नारखेडे आदी उपस्थित होते.  यावेळी संदिप सुरळकर यांनी सैन्यातील त्यांचे अनुभव कथन करत सैनिकांची व त्यांच्या कुटुंबीयांची मनस्थिती विषयी संवाद साधला. तर मुकुंद सपकाळे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या तसेच हे राष्ट्र समता , बंधुता व सार्वभौम लोकशाहीच्या मार्गाने चालविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असुन हिच शाहिदांना आपली श्रद्धांजली आहे असे सांगितले.

यशस्वीतेसाठी युनिटी ऑफ नेशन फाउंडेशनचे कुणाल सोनार , कल्पेश पाटील , बबलू मराठे, विशाल चौधरी, धनंजय पाटील आदींनी कामकाज पाहिले.  सूत्रसंचालन  व आभार  गिरणा पुनर्जीवन अभियानाचे प्रमुख विजय कोळी यांनी मानले.

 

Protected Content