Home धर्म-समाज फैजपूर शहरातील राष्ट्रीय एकता मंचतर्फे १५० मीटर भव्य तिरंगा यात्रा

फैजपूर शहरातील राष्ट्रीय एकता मंचतर्फे १५० मीटर भव्य तिरंगा यात्रा

0
43


फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ७५  व्या वर्षानिमित्त शहरातील जेष्ठ नागरिक येथून राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे १५० मीटर तिरंगा ध्वज भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

तिरंगा यात्रेत  भारत मातेचा सजीव देखावा साकारण्यात आला होता . तसेच घोड्यांवर तरुण तरुणी फेटे परिधान करून  हातात तिरंगा ध्वज घेऊन स्वार झाले होते.  शहरातील तरुण, तरुणी, महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ही तिरंगा यात्रेचा बस स्थानक, छत्री चौक, सुभाष चौक, खुशालभाऊ रोड, गावातील श्रीराम मंदिर, भारंबे वाडा, सुभाष चौक मार्गाने बाजारपेठेत समारोप करण्यात आला. गावातील रस्त्यावर महिलांनी रांगोळ्या व पुष्पवृष्टी करून तिरंगा यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. तिरंगा यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग दिसून आला

 


Protected Content

Play sound