युध्द पातळीवर काम केल्याने अखेर मुक्ताईनगरचा वीज पुरवठा सुरळीत

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे काल दुपारपासून खंडीत झालेला वीज पुरवठा अनेक तासांच्या मेहनतीनंतर रात्री उशीरा सुरळीत झाला असून यात वीज वितरणचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे.

 

३३ के.व्ही मुक्ताईनगर, घोडसगाव, निमखेडी व रुईखेडा उपकेंद्राला जोडणारी वीज वाहिनी वर वाढलेल्या भारामुळे दिनांक ८ दुपारून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे जम्पर तुटणे व इतर तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा खंडित होत होता. त्याचाच परिणाम म्हणून दिनांक ०९  सकाळी या वीज वाहिनीला जोडण्यासाठी लावण्यात येणारा पहिला भूमिगत केबल सकाळी ४ वाजता नादुरुस्त झाला आणि दुसरा केबल सुद्धा दुपारी तीन वाजता च्या दरम्यान बिघडली.

 

याच्यामुळे चारही उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे कृषी पंप ग्राहकांमध्ये व जनतेमध्ये असंतोष पसरला होता. दरम्यान, मुक्ताईनगरचे कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता   यांनी सदर बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करून संध्याकाळी ०६.३० वाजता सर्व गावठाण फिडरचा वीजपुरवठा सुरळीत केला. तसेच युद्ध पातळीवर  दखल घेऊन भूमिगत नादुरुस्त केबल सुद्धा रात्री १०.०० वाजता दुरुस्त केला. व रात्री ११.०० वाजेपर्यंत सतत काम करून सर्व कृषी पंप फिडरचाही वीज पुरवठा सुरळीत केला. ब्रजेश गुप्ता आणि सहकार्‍यांमुळे अखेर रात्री वीज पुरवठा सुरळीत झाला.

Protected Content