यावल शेळगाव मार्ग जळगाव पूल पाण्याखाली : वाहतुकीसाठी रस्ता बंद

यावल,  प्रतिनिधी तालुक्यातील शेळगाव मार्ग जळगाव जाणारा रस्ता तापी नदीला पाणी आल्याने तात्पुरता असलेला पुल व त्यावरील रस्ता बंद झाला असून  यावल ते बोरावल, टाकरखेडा मार्गावरून जळगावकडे जाणाऱ्या नागरीकांनी या मार्गाने आपली वाहने घेवुन येवु नये असे आवाहन परिसरातील नागरीकांनी केले आहे .

 

यावलहुन बोरावल, टाकरखेडा, शेळगाव,  असोदा, भादली मार्ग जळगाव जाण्यासाठी कमी वेळेत जाण्याचा हा पर्यायी मार्ग आहे.  या दोन दिवसात मध्य प्रदेश आणि  महाराष्ट्रच्या काही भागात मोठया प्रमाणावर पाऊस पडल्याने शेळगाव बॅरेजच्या बाजुस तात्पुरत्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता तापी नदीला पाणी आल्याने हा रस्ता पुर्णपणे पाण्याखाली आला  असल्याने या मार्गाने वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. यावल व परिसरातील नागरीकांनी जळगाव जाण्यासाठी या मार्गाने येवु नये तसेच हे वृत्त आपल्या संपर्कातील ईतर मंडळींना देखील माहीती देवुन कळवावे असे आवाहान टाकरखेडा गावातील युवक मित्रमंडळी यांनी कळविले आहे .

Protected Content