यावल प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ६ असून दोन जणांचा कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर यावल तालुका व्यापारी मंडळातर्फे तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात यावा अशी मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना देण्यात आलाय.
संपुर्ण देशात आणी महाराष्ट्र राज्याला विळखा लावणाऱ्या कोरोना संसर्गजन्य आजाराचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असुन, असे असतांना देखील यावल शहरात व परिसरात मात्र लॉकडाऊनचा काही फारसा गांर्भीय नागरीकांनी घेतलेले दिसुन येत नाही. बाजारात दिवसंदिवस सर्वत्र मोठी गर्दी दिसत आहे.
आत्तार्पंत फैजपूरात दोन, यावल शहरात दोन आणि तालुक्यातील कोरपावली येथे दोन असे एकुण ६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. दोन जणांचा कोरोना संशयित म्हणून मृत्यू झाला असून यात डांभूर्णी येथील तीन महिन्याची चिमकुलीचा समावेश आहे. हा आकडा अजून काही दिवसानंतर वाढणार असून यांचे गांभिर्य लक्षात घेवून यावल तालुका व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सलील महाजन, सचिव सचिन मिस्त्री, प्रविण वाणी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याशी भेट घेवून २१, २२ आणि २३ असे तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करावा अशी लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले. या संदर्भात आपण प्रांत आधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्याशी चर्चा करून आपल्या भावना त्यांच्या पर्यंत पहोचवतो असे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी सांगीतले. यावेळी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार व नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांची उपस्थिती होती.