यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी गेल्या महिन्याभरापासून यावल पोलीस प्रशासन अथक परिश्रम करीत आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीधारकांवर कारवाई करत दोनशे ते तीनशे रूपयांचा दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात शहरात विनाकारण फिरणे, तोंडाला मास्क न लावने, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे अशांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार २२ रोजी सकाळीच्या सत्रात १६ जणांवर कारवाई करत प्रत्येकाकडून २०० ते ३०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. दिवसभारात ३५ ते ४० दुचाकी धारकांवर कारवाई करत चौकशी करण्यात आली आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळून वाहनांची चौकशी करण्यात आली. १६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे. नारीकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी केले आहे.