यावल शहरात वनविभागाच्या कारावाईत सागवान लाकूड

यावल प्रतिनिधी । शहराजवळील सुतगिरणी परिसरात वनविभागाने केलेल्या कारवाईत हजारो रूपये किंमतीचे सागवान लाकडून जप्त केले आहे. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा जंगलातून अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार यावल वनविभागाने शुक्रवार १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता यावल शहरातील सुतगिरणी परिसरात असलेल्या अरशद शेख याच्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर सागवान लाकूड चिरकाम व रंधामशिनसह इतर सागवान वस्तू आढळून आले. वनविभागाने केलेल्या कारवाई ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वनविभागाची कारवाई करतांना संशयित आरोपी अशरद शेख हा फरार झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षण पी.व्ही.हडपे, क्षेत्रीय अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक आणि पोलीस नाईक यांनी कारवाई केली.

Protected Content