यावल प्रतिनिधी । विनापरवाना व बेकायदेशील गुरांची वाहतूक करणाऱ्या तिघांविरूध्द यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर व विनापरवाना गुरांची वाहतूक करतांना तालुक्यातील खिर्नीपुऱ्याजवळील पाईंटवर असलेल्या पोलीसांच्या निदर्शनास आले. सदरील वाहन क्रमांक (एमएच १४, डीएम १६१४) गाडीत संशयित आरोपी रईस बिसमील्लाखा, साजीद अजीज सय्यद व अब्दुल रशीद कच्छी बसलेले होते. तिघे घेवून जात असतांना पोलीस कर्मचारी पो.कॉ. गणेश मधुकर ढाकणे यांच्या लक्षात आल्याने वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र घाबरून वाहन घेवून पळ काढला. पो.कॉ. गणेश ढाकणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे .कॉ. नितीन चव्हाण पुढील तपास करीत आहेत.