यावल प्रतिनिधी । यावल कोविड केअर सेंटरने पाठविलेल्या कोरोना संशयितांचा अहवाल प्राप्त झाला असून यात तीन रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.
यावल तालुक्यात शनिवार पर्यंत एकुण १८ कोरोनाबाधित रूग्ण होते. आज नव्याने तीन रूग्णांची भर पडली असून एकुण रूग्ण संख्या २२ झाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब असून तालुका प्रशासन सतर्क झाली आहे.
यावल तालुक्यात कोरोनाने कहर केला असुन प्रथम डॉक्टर पित्रा पुत्र नंतर नगरसेवक आणि भाऊ आणि आता आता पोलीस पाटील पितापुत्रासह एका माजी नगरसेवक पत्नीचाहीचा समावेश झाला आहे. सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने रुग्ण संख्याही २२ वर पहोचली. यावल शहरात एकुण १४ प्रतीबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आली आहे. कोरोनाबाधीत पॉझिटीव्ह रुग्णांची वाढणारी संख्याही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घरात सुरक्षीत राहण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, नगरपरिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी, आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.