यावल प्रतिनिधी । येथील शहरातील बोरावल गेट या परिसरात मागील अनेक दिवसापासुन विविध प्रकारचे अवैध धंदे सर्रासपणे खुल्लेआम सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासुन नागरीकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभुमीवर यावल पोलीसांनी शहरातील बोरावल गेट परीसरात धाड टाकून एकाला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील बोरावल गेट परिसरात बोरावल गेटच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी ज्ञानेश्वर गजानन सापकाळे वय ४६ हा अवैधरित्या देशी दारूच्या बाटल्यासह पोलीसांना मिळुन आला. पोलीसांनी ज्ञानेश्र्वर सपकाळे याच्याकडुन बॉबी सत्रादेशी दारू१८o मिली लिटरच्या २२ बाटल्या किमत ११oo रुपये किमतीच्या तर टॅंगोपंच या १३०० रुपये १८० मिली लिटरच्या २६ सिलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असुन या संदर्भात पो.कॉ. भुषण रविंद्र चव्हाण यांनी ज्ञानेश्वर गजानन सपकाळे यांच्याविरूद फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशन मुंबई प्रोव्ही, अक्ट ६५ ( ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या आदेशाने पोलीस कर्मचारी नितिन चव्हाण करीत आहे. दरम्यान बोरावल गेट परिसरातील साने गुरुजी उच्च माध्यमीक विद्यालय आणी जिल्हा परिषद शाळेच्या अवतीभवती मागील अनेक दिवसापासुन जुगारीचे अड्डे, अवैध देशी दारू, गांजा व त्याचबरोबर खुल्ले आम जुगारीचे अड्डे व इतर सर्व प्रकारचे अवैध धंदे या परिसरात चालत असल्याची देखील तक्रारी आहेत.