यावल शहरातील बंद पथदिवे त्वरीत सुरू करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

यावल प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंदावस्थेत आहेत. यामुळे अंधारात अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे नगरपालिकेने पथदिवे त्वरीत सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरातील नागरीकांचे श्रध्दास्थान असलेले व्यास महाराज मंदीर  येथील प्रवेशद्वारा जवळील हायमस्ट लॅम्प व पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्री भाविकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे. त्याठिकाणी नदीकाट असल्यामुळे जाण्यास त्रास होवून अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १० मध्ये देखील पथदिवे बंदावस्थेत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेत त्वरील पथदिवे सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हितेंद्र गजरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content