Home धर्म-समाज यावल येथे हळदी- कुंकूचा कार्यक्रम उत्साहात

यावल येथे हळदी- कुंकूचा कार्यक्रम उत्साहात


यावल प्रतिनिधी । शहरातील नागवेल युवा फाउंडेशन यावल व बारी समाज महिला मंडळ यांच्यातर्फे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संध्या वाणी यांनी स्वीकारले व मार्गदर्शन प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहरातील ज्येष्ठ महिला मंगला बारी या होत्या. यावेळी संत रुपलाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता बारी यांनी केले. प्रस्तावना संगीता बारी (अध्यक्ष बारी समाज महिला मंडळ यावल) यांनी केले. तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार वर्षा बारी यांनी मानले. अतिशय उत्साहातच्या वातावरणात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बारी समाजातील महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागवेल बारी युवा फाउंडेशन व बारी समाज महिला मंडळातील सर्व सभासदांनी उत्कृष्ट सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडले.


Protected Content

Play sound