यावल : प्रतिनिधी । येथील बाबुजीपुरा, सिद्धार्थनगरमधील प्रभाग क्रमांक ५ मधील दलीतवस्ती योजनाअंतर्गत रस्ता सिमेंट कॉक्रीटकरणाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष सौ . नौशाद तडवी यांच्या हस्ते करण्यात आला
. यावल नगर परिषदच्या माध्यमातुन शहरातील विविध प्रभागामध्ये विकासकामे प्रगतीपथावर असुन, येथील प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष शेख असलम यांच्या प्रयत्नातुन मंजुर करण्यात आलेल्या सिद्धार्थनगर दलीतवस्ती योजनाअंतर्गत ७० लाख रुपयांच्या १४०० शे मिटरचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे भुमीपुजन नगराध्यक्ष सौ . नौशाद तडवी यांच्या हस्ते करण्यात आला
याप्रसंगी नगरसेवक शेख असलम , सामाजीक कार्यकर्ते हाजी हकीमोद्दीन खाटीक, मुबारक तडवी, मुनाफ खाटीक , समद खाटीक , रहेमान खाटीक , कलीम इंजिनिअर यांच्यासह प्रभागातील नागरीक उपस्थित होते . रस्त्याचे काँक्रीटीकरण होत असल्याने प्रभागातील नागरीकांनी नगरसेवक शेख असलम यांचे आभार मानले .