यावल प्रतिनिधी । करुणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लावण्यात आलेल्या संचारबंदी या कालावधीत शासकीय नियम न पडता सार्वजनिक ठिकाणी दुचाकी मोटर वाहनाने फिरताना आढळून आल्याने यावल पोलिसांनी अश्या आतापर्यंत सुमारे ४० वाहनधारकांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल शहरातील प्रमुख मार्गावर असलेल्या बुरूज चौक परिसरातून संचारबंदीचे कोणतेही नियम न पाळता आज १४ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे १५ वाहनधारकांवर आज कारवाई करण्यात आलेली आहे. यात राजेंद्र रघुनाथ धनगर यावल, जगदीश बाळू चौधरी रा. निंभोरा ता. रावेर, शेख फारुख शेख सुभान यावल, अफजलखान मुकद्दर खान यावल, शेख रहीम शेख कमृद्दिन फैजपूर, सागर प्रकाश भंगाळे चितोडा, दीपक भगवान पाटील विरावली, योगेश भागवत पाटील दहिगाव, अमीन खान युसुफ खान फैजपूर, सूपडु खान अय्युब खान फैजपूर, दिनेश कस्तुर वाघरी यावल, प्रवीण मनोहर देशमुख यावल, प्रफुल्ल शालिक जाधव यावल, फईन खान सलीम खान यावल यांच्यासह सुमारे ४० वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी गोरख पाटील करीत आहेत.