यावल येथे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांचा निषेध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिवसेना ही बंडखोरांची किंवा गद्दारांची शिवसेना नसुन हिन्दुह्लय सम्राट वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे.  तालुक्यातील शिवसैनिक पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच सोबत एकसंघ एकरूपी खंबीरपणे उभे असल्याचे तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले आहे.

 

 

महाराष्ट्र राज्याच्या मागील काही दिवसापासुन राज्याच्या हिताचे चांगले कार्य करणाऱ्या शासनाला भाजपाकडून अस्थिर करण्याचे कुटील डावपेच खेळले जात असुन, त्यांच्या या घाणीरडे राजकारणाला शिवसेनेचे काही गद्दार हे बळी पडले असुन, राज्यात सद्या अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे . असे असतांना ही राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडी शासन हे आपले उर्यरीत अडीच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करेल असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी सेनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रावेर आणी चोपडा महत्वाच्या बैठकीनंतर बंडखोरांच्या निषेर्धात आंदोलन करण्यात येणार असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले . या बंडखोरांच्या विरोधात व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी यावल तालुक्यातील तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे, यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, सेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, संतोष धोबी, पप्पु जोशी ,सागर देवांग , योगेश चौधरी , भरत चौधरी , सांगर बेहडे, मयुर धोबी , गोटुभाऊ सोनवणे यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी आहे .

 

Protected Content