यावल प्रतिनिधी । शहरातील शिवसेना कार्यालयात तालुका शिवसेना व आदिवासी सेना, युवासेनाच्या वतीने जागतिक आदीवासी दिन क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात येवून जागतिक आदिवासी दिनानिमित्त साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रवी सोनवणे, माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, आर.जी. पाटील, तालुका उपप्रमुख शरद रंगु कोळी, जगदीश कवडीवाले, संतोष खर्चे, योगेश राजपूत, योगेश पाटील, सागर देवांग, सागर बोरसे, सचिन कोळी, यावल कृषी बाजार समितीचे संचालक सुनील बारी, नाना साहेब, बिस्मिल्लाह तडवी, रऊफ तडवी, शिवसेना आदीवासी सेलचे तालुका प्रमुख हुसेन भाऊ तडवी, मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी यांचा आदिवासी दिनानिमित्त शाल व बुके देऊन शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला.