Home धर्म-समाज यावल येथे शिवजयंती निमित्ताने अभिवादन

यावल येथे शिवजयंती निमित्ताने अभिवादन


 

यावल, प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात आज महसुल प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, दिपक बाविस्कर, संतोष पाटील, रहेमान तडवी, युनुस खान आदी अधिकारी व कर्मचारी यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अपर्ण करून त्यांना अभिवादन केले. त्याचप्रमाणे यावल पोलीस स्टेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, पोलीस कर्मचारी संजय तायडे ,सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठान , अस्लम खान, संजय तायडे , भुषण चव्हाण यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.


Protected Content

Play sound