यावल, प्रतिनिधी | शहरात एक कोटींचे मंजूर झालेल्या निधीतून विविध विकासकामांचे उद्घाटन आज रावेर-यावल विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावल शहरातील जमालशहा कमालशहा बाबा दर्गा पासून ते सुर्दशन सिनेमा चौक मार्गावरील रस्त्याचे १० लाख खर्चाचे काँक्रीटीकरण , महाराणा प्रताप नगर ते इदगाह पर्यंत काँक्रीटीकरण रस्ता१० लाख, इम्रान पेहलवान यांचे घर पासून ते शब्बीर खान यांचे घरा पर्यंत काँक्रीटीकरण १० लाख रूपये खर्च, कुंभारखंद ते कबरस्थान पर्यंत काँक्रीटीकरण रस्ता १५ लाख रु., बाबानगर काँक्रीटीकरण रस्ता खर्च ३० लाख रु, संभाजी पेठ केशव कोळी यांचे घरा पासून ते पुंजो शेठ यांचे घरा पर्यंतचे काँक्रीटीकरण १० लाख रु., अर्षद खान यांचे घरा पासून ते मुस्तुफा खान यांचे घरा पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण खर्च १० लाख रुपये,
तिरुपती नगर भागात सुरेश पाटील पत्रकार यांचे घरा पासून ते उस्मान तडवी यांचे घरापर्यंत काँक्रीटीकरण १० लाख रुपये खर्च, असे एकूण १ कोटी ५ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे शुभारंभ करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमास जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, माजी जेष्ठ नगरसेवक गुलाम रसूल गुलाम दस्तगीर , सैय्यद युनुस सैय्यद युसुफ,नगरसेवक शेख अस्लम शेख नबी,नगरसेवक समीर खान ,नगरसेवक समीर शेख मोमीन,नगरसेवक मनोहर सोनवणे, हाजी गफ्फार शहा,अनिल जंजाळे, करीम कच्छी, रशीद मण्यार,उस्मान खान,अष्पाक शहा , फारुख मोमीन, भुर्या शाह,शेख सकलेन आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.