यावल प्रतिनिधी । देशातील दोन कोटी युवकांना रोजगार निर्मितीचे पोकळ आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाचे कंबरडे मोडले आहे. या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन युवक काँग्रेसने तहसीलदार यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या पोकळ आश्वसनामुळे देशातील युवकांमध्ये बेरोजगारी वाढली असुन त्याचबरोबर देशात जीएसटीची चुकीच्या पद्धतीने अमलबजावणी केल्यामुळे देशातील कुटीर लघु मध्यम क्षेत्राचे व छोटे व लघु उद्योगधंद्याचे कंबरडे मोडले आहे केन्द्र शासनाने भारतीय सांख्यीकी आयोगाच्या एनएससी च्या अहवालानुसार देशात २०१७-१८ या वर्षात बेरोजगारीचादर ६ .१ टक्के असुन देशातील ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर ५ .३ टक्के होता तर शहरी भागात ७.८ टक्के राहीला.
देशातील तरूणामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक, म्हणजे १३ते २७ टक्क्यांवर पोहचला तर कोरोना काळात केन्द्राने चुकीचे नियोजन केल्याने संकटात हे बेरोजगारीचा आकडा १२ते १३करोड लोक हे बेरोजगार झाले असल्याचे सिएमएलई च्या पाहणीतुन समोर आले आहे .पंतप्रधान नरेन्द्र मोदीच्या चुकीच्या धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली असुन , यामुळे देशाचा आर्थिक उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जुन तिमाहीत घसरून २३.९ टक्कयांनी असल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील राज्यांना विश्वासात न घेता भारतीय संविधानाने ठरवुन दिलेल्या संघराज्यीय रचनेचा आदर न करता राज्यांशी सल्लामसलत न करता आडमुठ कारभार करीत आहे. केन्द्र शासनाने कोरोनाच्या कठीन समयी राज्यांना आर्थिक मदत करून सक्षम केले पाहीजे तसे न करता केन्द्र शासन हे बिगर भाजप शासित राज्यांना शासन चालवणे मुश्कील केले आहे .सरकारी आस्थेपनाचे खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण घालवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंजेडा हे मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार पुर्णत्वास नेत आहेत . तरी केन्द्र शासनाने जाहीर केलेली रोजगारीची निर्मितीचे आश्वासन पुर्ण करून देशातील युवकांना रोजगार उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इमरान पहेलवान, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष खुर्शीद एजाज पिंजारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, करीम खान, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहुल बारी, कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, तस्लीम पिंजारी, ईस्हाक शेख मोमीन, रहेमान शेख रशीद आदींच्या स्वाक्षरी आहे.