Home Cities यावल यावल येथे युवा वॉरीअर्स शाखा फलकाचे अनावरण

यावल येथे युवा वॉरीअर्स शाखा फलकाचे अनावरण

0
20

 

यावल, प्रतिनिधी । येथील यावल भुसावळ मार्गावर आज  शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी रोजी  भाजपा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी,सचिव  अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल येथे भाजपा युवा मोर्चाच्या १८ ते २५ वयोगटातील युवकांच्या युवा वारीयर्स शाखेचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यावल नगर परिषदचे नगरसेवक  डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,  युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष सागर कोळी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष योगेश खेवलकर, यावल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रितेश बारी, भूषण फेगडे, भाजपा सरचिटणीस स्नेहल फिरके, शाखा अध्यक्ष -अविनाश बारी, उज्वल कानडे, संजय फेगडे,  हेमंत फेगडे, कोमल इंगळे, सागर इंगळे, प्रथमेश घोडके, सागर लोहार, देवेंद्र फेगडे, अक्षय चौधरी, भूषण धोत्रे, दिनेश माळी, जय वानखेडे, राहुल पाटील, केतन चोपडे, सागर लोखंडे, आरिफ तडवी आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound