यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
प्रदेश युवक काँग्रेसचे आदेशानुसार व जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या सुचणे प्रमाणे व प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. उल्हास पाटील,आ.शिरीष चौधरी,काँग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, शहराध्यक्ष कदिर खान यांचे मार्गदर्शनखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसा निमित बेरोजगार दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात रावेर विधानसभा क्षेत्र चे युवक अध्यक्ष फैजान शाह यांनी चहा बनवून नागरिकांना पिण्यास दिली, नागरिकांना आश्र्वस्त करून सांगितले की, आज आपल्या देशात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता असून मागील ८ वर्षा पासून आजपर्यंत युवकांना रोजगार देण्यापासून वंचित ठेवण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. भाजपा सत्तेत आले असतांना मोदी यांनी देशातील दोन कोटी बेरोजगार युवकांना प्रतिवर्ष रोजगार देऊ असे खोटे आश्वासन देऊन मायबाप जनतेला मूर्ख बनवले, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना देशाची सुत्रे सांभाळण्यास ९ वर्षाचा कालावधी झाला असुन, देशातील युवा आज देखील रोजगार साठी अपेक्षित आहे. बेरोजगारी हा आपले देशाचा प्राथमिक प्रश्न आहे ज्यांना भाजपा सरकार अमुक अमुक अजेंडे चालवून दाबण्याचे काम करत आहे. पण देशाच्या या गंभीर प्रश्नावर काँग्रेस या विषयी सतर्क असून नेहमीच जनतेच्या व युवकांच्या प्रश्नावर लक्ष वेघण्यासाठी काम करणार आहे.
याप्रसंगी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह, कफिल खान, आदिल शेख, अनवर शेख, नेहाल पटेल, इब्राहिम सय्यद, आदिल सय्यद, जाबिर सय्यद, अरबाज खान, याच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.