यावल येथे मनसेतर्फे विविध भागात निर्जंतूकीकरण औषधाची फवारणी

यावल प्रतिनिधी । येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र नागरीकांमध्ये आरोग्याविषयी भितीचे वातावरण पसरले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागाचे मनसेतर्फे निर्जंतूकीकरण औषधाची फवारणी करण्यात आली.

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावल येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वखर्चाने कोरोनाच्या महामारीच्या आजारातून सुरक्षीत राहण्याकरीता नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत शहरातील सुतारवाडा, संभाजी पेठ, पारधी वाडा, कैकाडी वाडा, कोळीवाडा, नवरंग पेठ, गोष्टी वाडा आदी क्षेत्रातील नागरी वस्तीत संपूर्ण परिसरामध्ये औषधाची फवारणी करून क्षेत्राचे निर्जंतुकीकरण केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व सर्वांनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महत्वाचे परिश्रम घेऊन सहकार्य केले. याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष चेतन अढळकर, गोविंदा सुतार, योगेश सपकाळे, रोहित सुतार, कैलास नन्नवरे, अक्षय नन्नवरे, भूषण अढळकर, राजू लोखंडे, किशोर नन्नवरे, उदय अढळकर, मुकेश माळी या सर्वांनी त्यांना सहकार्य केले. दरम्यान मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या नागरीकांच्या आरोग्य विषयी स्तुतीय सामाजीक उपक्रमाचे परिसरातील सर्व नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करून आभार मानले जे कार्य नागरीकांच्या आरोग्य दृष्टीने नगरपालिकांनी करायला हवे होते ते कार्य एक संघटना म्हणून तुम्ही करत आहात असे भावनिक उद्धगार नागरिकांनी व्यक्त केले व त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शाबासकी दिली.

Protected Content