यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाची दिशाभूल करून पिवळे कार्ड व प्राधान्य कुटुंबाचे रेशन कार्ड वापरणाऱ्यांच्या योजना तातडीने बंद कराव्यात या मागणीसाठी भिम आर्मीचे यावल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाने गरीब गरजूंसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. यात पिवळे कार्ड व प्राधान्य कुटुंबाचे रेशन कार्डच्या माध्यमातून रेशन दिले जाते. परंतू या योजनेचा गैरवापर करून श्रीमंत आणि धनाढ्य नागरीक योजनेचा लाभ घेत आहे. यावल तालुक्यातील देशील हा प्रकार मोठ्या प्रमाणार आहे. तरी याबाबत चौकशी करून तातडीने पिवळे रेशन कार्ड आणि प्राधान्य कुटुंबाचे रेशन कार्ड रद्द करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन भीम आर्मीच्या वतीने करण्यात आले आहे.
या निवेदनावर यावल तालुकाध्यक्ष प्रविण डांबरे, कार्याध्यक्ष निलेश सपकाळे, उपतालुकाध्यक्ष आकाश बिऱ्हाडे, सचिन पारधे, बबलू गजले, जितेंद्र गायकवाड, प्रशांत गजरे, इम्रान शेख, गोलू गजरे, सागर मेढे, पवन पारधे, रोहिम सोनवणे, बंटी सोनवणे, आंनद तायडे, आकाश गजरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.