यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडीने जनतेसह शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न सोडविण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. आज भाजपाच्या वतीने भाजपाने यावल येथे भुसावळ टी पाईंटवर जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपुर्ण जगासह देशावर आणी राज्यात ओढवलेल्या कोरोना संसर्ग संकटाच्या काळात राज्यातील सर्व उद्योग बंद होते. तसेच शेतकऱ्यांचा विज वापर ही बंद होता असे असतांना सुद्धा विज वितरण कंपनीने उद्योजकांना शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य घरगुती विज ग्राहकांना भरमसाठ बिले देवुन नागरीकांना संकटात टाकले आहे. माजी मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुधाला सरसकट प्रति लिटर ५ रूपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीस अनुदान दिले गेले होते, मात्र आता दुधाचे दर त्या वेळेपेक्षाही खालावलेले आहेत व त्यामुळे दुध उत्पादक आर्थिक अडचणीत आलेले आहे. तरी राज्यातील महाविकास आघाडी शासनाने गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान तसेच दुध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रूपये अनुदान देण्यात यावे व दुध खरेदीचा ३० रूपये करण्यात यावा. कोरोना संकटाच्या सुरूवातीपासुन केळी पिकावर आलेली संक्रात अद्यापही सुरूच असुन, वाहतुक अडचणीमुळे व व्यापाऱ्यांच्या अडवणुकीमुळे सर्व केळी उत्पादकच वेठीस धरला जात असुन त्याचप्रमाणे शासनाने लादलेले केळी पिक विम्याचे सुलतानी संकट हे शेतकरी बांधवांची पाठ सोडत नसल्याचे दिसुन येत आहे . कै. माजी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या कार्यकाळात केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याची भरपाई मिळाली, तरी महाविकास आघाडी शासनाने आताचे लादलेले केळीपिक विम्याचे निकष त्वरीत रद्द करून मागील निकष पुर्वरत लागु करून राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीचे निवेदन यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना दिले.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, गणेश नेहते, उमेश पाटील भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश फेगडे, राकेश फेगडे, लहु पाटील, विलास चौधरी, देवीदास पाटील, उज्जैनसिंग राजपुत, अनंत नेहते आदींनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला.