यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाची बुथ सशक्तीकरण अभियाना अंतर्गत संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत पार पडली.
आगामी काळात होवु घातलेल्या निवडणुकांना लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने रावेर लोकसभा क्षेत्र भाजपाची संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक आज रोजी यावल येथील श्री महर्षि व्यास मंदिराच्या सभागृह येथे खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.
या बैठकीत खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित भाजपा यावल तालुका प्रमुख पदाधिकारी, बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना बुथ सशक्तीकरण तसेच केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमा बाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी सरकारच्या ९ वर्ष पुर्तीबद्दल महा जनसंपर्क अभियान बद्दल माहिती देऊन, केंद्र सरकारच्या योजनाच्या लाभ घेतलेल्या लाभार्थ्याशी संपर्क करणे बाबत सांगितले, तसेच उपस्थित बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना सुधारित नूतन मतदार यादी किट वाटप करण्यात येऊन मार्गदर्शन केले.
यावेळी खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,शरद महाजन, नारायण चौधरी, जिल्हा सरचिटणीस व बाजार समिती सभापती.हर्षल पाटील,भरत महाजन,नरेद्र नारखेडे, माजी जि.प.सदस्य सौ.सविता भालेराव, सौ.कांचन फालक, जिल्हा दूध संघ संचालक नितीन चौधरी,गणेश नेहते माजी पं.स.सभापती सौ.पल्लवी चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, सरचिटणीस विलास चौधरी आणी उज्जैनसिंग राजपूत, डॉ.कुंदन फेगडे, पुरोजीत चौधरी, भाजयुमो तालुका अध्यक्ष सागर कोळी, निलेश गडे, अनंत नेहेते, पी. एच. सोनवणे, महिला आघाडी अध्यक्षा सौ.जयश्री चौधरी, परसाळे सरपंच सौ.मीना तडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे,विलास पाटील, उमेश पाटील,सूर्यभान पाटील, श्री.सागर महाजन,दीपक चौधरी, पंकज चौधरी, संजय पाटील, यशवंत तळेले, सौ.राखी बर्हाटे, हेमराज फेगडे, श्री.किरण महाजन, रितेश बारी, परेश नाईक, नितीन नेमाडे, सौ.सीमा वाघ, खेमचंद कोळी ई. उपस्थित होते.