यावल प्रतिनिधी । यावल शहरातील समर्थ नगर परिसरात बंद बंद घर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून घरातील सोन्या-दागिन्यांसह रोकड असा एकूण ४७ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, कांतीलाल रामसिंग पाटील (वय-६२) रा. स्वामी समर्थ नगर यावल हे पत्नी मुलगा सून व नातींसह राहतात. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व कुटुंबीय यावल तालुक्यातील निमगाव येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा लोखंडी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून ठेवलेले ६ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ४७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे राहुल सोपान चौधरी यांनी कांतीलाल पाटील यांना फोनद्वारे घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार कांतीलाल पाटील हे पत्नी व मुलासह घरी आले. घरात चोरी झाल्याचे दिसून आले घरातील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला. त्याचप्रमाणे घरातील ठेवलेले रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कांतीलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनि विनोद खांडबहाले करीत आहे