यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना आखण्यासाठी विभागीय प्रांत आधिकारी डॉ अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक पार पडली.
यावल नगर परिषदच्या सभागृहात आज विभागीय प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी यावल शहरात मागील एक महीन्या पासुन कोरोना विषाणुचा सातत्याने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्याकामी तसेच पावसाळापुर्वी नगर परिषद व्दारे घ्यावयाची काळजी घेण्यासाठी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर यावल नगर परिषदच्या माध्यमातुन संयुर्ण शहरातील प्रत्येक घरातील नागरीकांच्या आरोग्य तपासणी संदर्भात सुचना दिल्या असुन याकरिता प्रांत अधिकारी यांनी दहा पथकाची नेमणुक करण्यात आली आहे. यातील प्रत्येकी एका आरोग्य तपासणी पथकात तिन कर्मचारी असतील दरम्यान शहरातील नागरीकांची आरोग्य तपासणी करतांना जेष्ठ नागरीकांची अधिक काळजी घ्यावयाच्या सुचना दिल्या.
या बैठकीस तहसीलदार जितेन्द्र कुवर, यावल नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी, स्वच्छता अधिकारी शिवानंद कानडे, बांधकाम अभियंता हाजी सईद शेख खाटीक, रमाकांत मोरे, विजय बढे यांच्यासह सर्व कर्मचारी बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते. प्रतीबंधीत क्षेत्राच्या निगराणी करीता पोलीस प्रशासनकडे बंदोबस्त सोपविण्यात आले आहे.