यावल, प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात नागरिकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे आदी उपायोजना केल्या आहेत. या उपाययोजनांचे पालन काही नागरिक करीत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करून १ लाख सत्तर हजार रुपये दंड यावल पोलिसांनी वसूल केला आहे.
यावल पोलीसांनी पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांचे पालन न कारणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून १ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात त्यांनी नियम तोडणाऱ्या जवळपास दोनशे पन्नासहुन अधिक तोंडाला मास्क किंवा रूमाल न लावणे , पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र बसणे .विनाकारण बाहेर फिरणाऱ्या रिकामटेकड्या अशा बेशिस्त नागरीकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद खंडबहाले, पोलीस उय निरिक्षक सुनिता कोळपकर , सहाय्यक फौजदार मुज्जफर पठान , फौजदार अजीज शेख ,पोलीस कर्मचारी अस्लम खान, सुशिल घुगे नितिन चव्हाण, संजय देवरे , संजय तायडे यांचे पथक करीत आहेत.