यावल प्रतिनिधी । शहरातील बुरूज चौकात अवैध दारू विक्री करणे आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी आणि १४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये संचारबंदी लागू करण्यात आली असतांना संशयित आरोपी विजयसिंग नथ्थुसिंग लोधी (वय-५५) रा. साकळी ता. यावल हा ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील बुरूज चौकातील सार्वजनिक ठिकाणी दुचाकी क्रमांक (एमएच १९ आर १९५३) मध्ये अवैधरित्या विदेशी दारू विक्री करत असतांना यावल पोलीसांनी छापा टाकून संशयित आरोपी विजयसिंग याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दुचाकी आणि १४ हजार ६२० रूपयांची विदेशी दारू हस्तगत केली आहे. पो.कॉ. सतीष भोई यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विजयसिंग लोधी यांच्या विरोधात अवैध दारू विक्री करणे आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस कर्मचारी करीत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००