यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यांचा नुकताच मेळावा पंचायत समितीत घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिनी बेंडाळे होत्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही.. मानधनाचा फरक देण्यात आलेला नाही ..त्याच प्रमाणे सीबीई ची बिले मिळालेले नाहीत. भाऊबीज मिळालेली नाही जून महिन्यापासून खाऊची बिले नाहीत .टी ए बिले नाहीत हा मागण्यांसाठी जळगाव येथे जिल्हा परिषदेसमोर ‘मानधन दो, या जेल दो’ या मागणीसाठी आंदोलन केले जाणार असल्यान आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होणार यावल तालुक्यातील सर्वांनी 31 जानेवारी रोजी जळगाव येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानमध्ये सकाळी 1२ वाजता जमावे असे आवाहन कॉम्रेड अमृत महाजन यांनी केले.
कार्यकारिणीची निवड
कार्यक्रमास तालुक्यातील दहा गावचे अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तालुक्यासाठी कार्यकारिणी निवड झाली. त्यात फरिनबी( मारुळ) यांची उपाध्यक्षपदी सुशीला बाविस्कर तर म्हणून सचिव उषाबाई सपकाळे, सहसचिव शालिनी बेंडाळे, खजिनदार रिता शिर्तुरे, सल्लागार सुरेखा पाटील, सदस्य सुरेखा तडवी, फतेमा जोहरा ,सुलभा जंगले, शकुंतला पाटील व इतर ५ जागा रिक्तअशी १५ जणइंची निवड करण्यात आली.