यावल प्रतिनिधी । शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, सलाम मुंबई फाऊंडेशन, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा संयुक्त विद्यामानाने जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त कार्यशाळा युद्ध पातळीवर वर अभियान असून असून प्रत्येक तालुक्यात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावल येथे गटशिक्षणाधिकारी एजाज शेख यांचा अध्यक्ष ते खाली मुख्याध्यापक यांची कार्यशाळा पार पडली. त्यात सलाम मुंबई फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा समनव्यक जयेश माळी व जिल्हा तंबाखू नियंत्रण समनव्य समिती सदस्य व जन मानवता बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर यांनी उपस्तीत मुख्यध्यपक यांना 11 निकष कसे भरावे यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार अधिकारी नईम, केंद्र प्रमुख ठाकूर, सोनवणे, सोनार, एन.डी. तडवी, सुलोचना बोरोले, जी.ई.खान प्रमुख उपस्थिती होते. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रशिक्षिका अश्विनी कोळी, भीमराव सुरवडे यांनी परिश्रम घेतले.