यावल येथे उद्यापासून नाफेडद्वारे हरभरा खरेदीस होणार प्रारंभ

 

यावल, प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्राचा उद्या शुक्रवार  दि. १९ मार्च रोजी  कृषी उत्पन्न बाजार समितीत शूभारंभ करण्यात येणार आहे.   

आमदार लताताई सोनवणे, आमदार शिरीष चोधरी ,खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता काटापूजन  व धान्य पूजन करून हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार आहे.  याप्रसंगी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधीकारी, तहसीलदार महेश पवार, यावल,कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, उपसभापती व संचालक मंडळ, जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, आर. जी. पाटील (नाना ), जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, पंचायत समीती सभापती सौ.पल्लवी पुरूजीत चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे व पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते शेखर सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य दिपक अण्णा पाटील, उमाकांत रामराव पाटील, कलीमा सायबु तडवी, सरफराज सिकंदर तडवी, लताबाई विजय मोरेआणि खरेदी उपाभिकर्ता विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावली चेअरमन राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ, खरेदी विक्री संस्था संचालक मंडळ, सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव, तसेच शेतकरी यांनी उपस्थिती द्यावी आणि शासन निर्देशीत कोवीड १९ चे सर्व नियम सर्वाना पाळावयाचे आहेत असे आवाहन विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे, सचिव मुकुंदा वामन तायडे यांनी केले आहे.

Protected Content