यावल प्रतिनिधी । येथील रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आ.शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्याच्या नागरीकांशी थेट संपर्क साधुन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन त्यांना न्याय मिळुन देण्याच्या दृष्टीकोणातुन २७ जानेवारी २०२० रोजी जनता दरबार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या या कार्यक्रमास तालुक्यातील जनतेकडुन मोठा प्रतिसाद मिळाला.
यावल येथील तहसील कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय ईमारतीच्या परिसरात आज सकाळी ११ वाजता या जनता दरबार कार्यक्रमास सुरुवात झाली याप्रसंगी आ.शिरीषदादा चौधरी हे या जनता दरबार कार्यक्रमाच्या केन्द्रस्थानी होते. या जनता दरबार कार्यक्रमाला फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्यासह तहसीलदार जितेन्द्र कुवर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जहाँगीर तडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.बी.बी.बारेला, शिक्षण अधिकारी एजाज शेख, आदीवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी आदी विभागातील अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे राष्ट्रवादीचे विजय प्रेमचंद पाटील पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, पचायत समिती सदस्य सरफराज सिकंदर तडवी काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अनिल जंजाळे यावेळी प्रामुख्याने उपास्थित होते.
आमदार शिरीषदादा चौधरी यांनी घेतलेल्या या जनता दरबार कार्यक्रमात सर्वाधिक तक्रारी या तहसील च्या पुरवठा विभागाच्या संदर्भात प्राप्त झाल्यात या असंख्य नागरीकांनी आम्हासधान्य मिळत नसल्याच्या तर काहीनी आम्हाला अपुर्णधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यात, यानंतर यावल नगर परिषदच्या भोंगळ कारभारा बद्दल तक्रारी आल्यात यात शहारातील विस्तारीत भागात नव्यावसाहतीमध्ये असलेले विविध दुर्लक्षित समस्या आणी कामे असो किंवा शहरातील स्वच्छतेचा प्रश्न असो या सर्व विषयांवर नागरीकानी नगर परिषदेच्या अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले, याशिवाय तालुकाक्यातील शेतकरी बांधवांना पी.एम.किसान योजनेचे लाभ मिळत नसल्याच्याही अनेक तक्रारीसमोर आल्यात, तसेच यावल येथील महाविजवितरणच्या वतीने वापरापेक्षा अधिक अव्वा की सव्वा अशी बिले पाठवुन त्यांना बिले सक्तीने भरण्यास लावत असुन नागरीक या विषया घेवुन चांगलेच अडचणी येत असल्याच्याही मोठया तक्रारी या वेळी नागरीकांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यासमोर कथन केल्यात, याशिवाय अन्य विभागाच्या देखील तक्रारी या वेळी नागरीकांनी या जनता दरबाराच्या माध्यमातुन केल्यात . यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सर्व नागरीकांची तक्रारी व ग्राहणी ऐकुन घेत आपण या समस्या आणी अडचणी सोडविण्याचे आपण सर्वतोपरीने प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी दिले.