यावल प्रतिनिधी । यावल नगरपरिषद संचलीत सानेगुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर बाजी मारली आहे.
विद्यार्थ्यांनी घेतलेले विषय आवड व चिकाटी तसेच कठोर मेहनतीच्या बळावर अभिनंदनास पात्र ठरले आहे. मल्टीस्किल व ऑटोमोबाईल विषयांचा निकाल 100 टक्के लागलेला आहे.
मल्टिस्किल-इलेक्ट्रिकल टेक्निशियन
रूकसाना गबाब तडवी (99/100) राज्यास्तरावर दुसरा तर नाशिक विभागात प्रथम, अक्षय अविनाश पाटील ( 98/100), काजल ज्ञानेश्वर कोळी (98/100), कुंदन किशोर सुतार (97/100) आणि सागर महेंद्र मोरेकर (97/100) असे गुण मिळविले आहे.
ऑटोमोबाईल सर्व्हीस टेक्निशियन
शाळेतून प्रथम आलेला विनीत सुधाकर झोपे(92/100), समीर रमजान तडवी (91/100), प्रतीक उत्तमराव निळे (90/100) असे गुण मिळविले आहेत. राज्यस्तरावर पात्र झालेले विद्यार्थी तसेच शालेय स्तरावर संस्थेतर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.