यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली दहा रुपयांमध्ये स्वस्त जेवण देण्याची शिवभोजन थाली केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राला मोलमजूरी व नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे
शिवशक्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सध्या संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेली आहे. या काळात मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ येणार नाही या दृष्टिकोनातून शासनाने राज्यातील विविध शहरांमध्ये अशाप्रकारे शिवभोजन थाली केंद्र सुरू केले आहे. यातूनच आजपासून यावर शहरातील भुसावळ टीपॉईंटवर व्यापारी संकुलनात यावल येथील शिवशक्ती महिला बचत गट द्वारे या भोजन थाली योजनेचे शुभारंभ करण्यात आला. या भोजनाचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी दुपारी १२ ते २ या कालावधीमध्ये १०० नागरिक या भोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवभोजन थाली योजना समितीचे अध्यक्ष तहसीलदार जितेंद्र कुवर व शिवशक्ती महिला बचत गट यावल यांच्यावतीने करण्यात आले आहेत. दरम्यान कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ही भोजन थाली ५ रुपयांमध्ये मिळणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.