यावल, प्रतिनिधी । येथील एसटी आगारातील कर्मचाऱ्याच्या पत्नीला एक भामटयाने फोन पेव्दारे ७८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली असून याबाबत पोलीसात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील एसटी आगार मॅकेनिक म्हणुन कार्यरत असलेले संजय रामभाऊ मेहरकुरे (वय ४२ वर्ष मुळ राहणार शिरसी तालुका उमरेड जिल्हा नागपुर , ह . मु . गणपती नगर यावल) हे मागील सहा वर्षापासुन यावल एसटी आगारात मॅकेनिक या पदावर कार्यरत आहेत. मंगळवार दि ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.२१ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी माधुरी यांना ७०२९४३५९१७या मोबाईल क्रमांकावरुन एका हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तिने आपल्या मोबाईलची फोन पे प्रोव्हायडर असल्याची बतावणी करीत फिर्यादी यांचे स्टेट बॅंक ऑफ इंडीया यावल शाखाचे खाते क्रमांक घेवुन आरोपीने वेगवेगळे खात्यांची लिंक टाकुन फोन पे ९८३४ असे हा क्रंमांक व २१६५० हा क्रंमाक दोन वेळा तर १०६५० हा क्रमांक दोन तर ४८४८ हा क्रंमाक एक वेळेस टाकुन प्रथम ९ हजार ८३४ रूपये, ९ हजार ८३४ रूपये , नंतर तिसऱ्या टप्यात २१ हजार ६५० पुन्हा २१ हजार ६५०नंतर १० हजार६५० व ४ हजार८४८ असे एकुण ७८ हजार४ ६६ रुपयांची रक्कम फोन पे प्रोव्हाडर करण्याच्या नांवाखाली रक्कम काढून घेतली. या फसवणुकीबाबत संजय रामभाऊ मेहरकुरे यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून त्या अज्ञात व्यक्ति विरूद्ध भाग५ गु . र. न.४ / २०२१ माहीती तंत्रज्ञान कायदा २०००चे कलम ६६ भादवी कलम४२०अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय तायडे हे करीत आहे. दरम्यान, स्टेट बँक कर्मचारी किंवा अधिकारी म्हणुन अज्ञात व्यक्तीचा फोन येत असेल व तो तुमच्या फोन पे पासवर्ड व इतर आपल्या बँक खात्याशी माहीती विचारत असेल तर अशा फोनवरून कृपया माहीती देवु नये असे आवाहन सर्व ग्राहकांना स्टेट बँकेच्या सुत्रांकडुन देण्यात येत आहे.